हमालीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 09:45 PM2021-01-07T21:45:32+5:302021-01-07T21:45:50+5:30

जळगाव : दाणाबाजारातील व्यापारी व कामगारांची नुकतीच बैठक पार पाडली. यामध्ये तीन वर्षांसाठी हमालीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा ...

Cargo rates rise by 25 per cent | हमालीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ

हमालीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ

Next

जळगाव : दाणाबाजारातील व्यापारी व कामगारांची नुकतीच बैठक पार पाडली. यामध्ये तीन वर्षांसाठी हमालीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

नव्याने हमालीच्या दरात वाढ होण्यासाठी नुकतीच लक्ष्मीनारायण मनियार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत २५ टक्के प्रमाणे हमालीच्या दरात वाढ करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बैठकीमध्ये व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, कामगार सेनेचे अध्यक्ष शेषराव वलकर, अशोक धूत, मुकेश लोटवाला, सतीश जगवाणी, कांतीशेठ वाणी, सुभाष कारभोळ, राजू जगताप, सुरेश गायकवाड, संजय कदम आदी उपस्थित होते.

 

Web Title: Cargo rates rise by 25 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.