चातक संस्थेने हतनूर जलाशयावर केली फुलपाखरू गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:44 AM2020-09-28T11:44:09+5:302020-09-28T11:46:11+5:30

चातक संस्थने हतनूर जलाशयावर फुलपाखरू गणना केली, त्यात ६० प्रजातींची नोंद करण्यात आली.

Butterfly count done by Chatak Institute on Hatnur reservoir | चातक संस्थेने हतनूर जलाशयावर केली फुलपाखरू गणना

चातक संस्थेने हतनूर जलाशयावर केली फुलपाखरू गणना

Next
ठळक मुद्दे६० प्रजातींची केली नोंददेशभरातील गणनेत चातक संस्थेचा सहभाग



संकेत पाटील
खिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करत असतात. अशा फुलपाखरांची गणना चातक निसर्ग संवर्धन संस्थेमार्फत हतनुर येथील जलाशयावर रविवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत 'बिग बटरफ्लाय मंथच्या निमित्ताने फूलपाखरू गणना करण्यात आली. परिसरातील पक्षीमित्र व इच्छुक या उपक्रमात सहभागी झाले होते. यात हतनूर जलाशय परिसरात विविध आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली फुलपाखरांच्या संवर्धनासाठी भारतात सप्टेंबर महिना बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्यात येत आहे. मोहिमेत ३५ संस्था सहभागी असून यातीलच चातक निसर्ग संवर्धन संस्थेने सहभाग नोंदवून यात गणना केली.

आढळले फुलपाखरू -
जास्त संख्येने क्रिमसन टीप (केशर टोक्या), व्हाईट ऑरेंज टीप (पंधरा शेंदूर टोक्या), येलो ओरंज टीप (पिवळा शेंदूर टोक्या), मोटल एमिग्रँट (चट्टेरी भटक्या), कॉमन एमिग्रँट (भटक्या), पॉइनर (गौरांग), कॉमन ग्रास येलो (तृण पिलाती), डानाईड इगफ्लाय (छोटा चांदवा), टावनी कॉस्टर (कृष्ण कमलिनी) यांच्यासह ६० प्रजातींची नोंद करण्यात आली.
यावेळी गणनेत अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, सदस्य श्री महाजन, समीर नेवे, सौरभ महाजन, प्रशांत पाटील, संजय पाटील, शमनोज बडगुजर यांनी सहभाग नोंदविला.


सप्टेंबर ह्यबटरफ्लाय मंथह्ण;सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ह्यबटरफ्लाय मंथह्ण म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात यांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.


फुलपाखरू हे जैवविविधते मधील महत्वाचा घटक आहे. पर्यावरणातील परागीभवनाचे महत्वाचे काम ते करतात. फुलपाखरू हे उत्तम पर्यावरणाचे इंडिकेटर आहे, निसर्ग सौंदर्यात ते भर घालतात. त्यांचे निरीक्षक केल्याने तणाव, थकवा नाहीसा होऊन उत्साहात भर पडते. आजच्या गणनेत या भागात दुर्मिळ असलेले आफ्रिकन मरब्लेड स्कीपर ( संगमरवरी सैराट) व डार्ट प्लाम डार्ट (गडद शर) यांची नोंद घेण्यात आली. सदर गणनेची माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व बॉम्ब न्याचरल हिस्ट्री सोसायटी याना कळविण्यात येईल.
-उदय चौधरी, फुलपाखरू अभ्यासक सचिव, चातक निसर्ग संवर्धन संस्था.

Web Title: Butterfly count done by Chatak Institute on Hatnur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.