पाचोऱ्यात भरदिवसा धाडसी चोरी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:59 PM2021-02-06T18:59:11+5:302021-02-06T18:59:53+5:30

यशोदानगर भागात भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला.

Bravery theft all day in Pachora, Lampas looted Rs | पाचोऱ्यात भरदिवसा धाडसी चोरी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

पाचोऱ्यात भरदिवसा धाडसी चोरी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देलाकडी दरवाजाचे कुलूप तोडून दागिनेही लांबवले

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : शहरातील यशोदानगर भागात दि. ५ रोजी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात असलेले सोन्या-चांदीचे दागिने यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.

शहरातील विनोद दीपचंद बोथरा (यशोदानगर, पाचोरा) हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी कासमपुरा येथे खासगी वाहनाने गेले होते. त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी वस्तीतील विनोद बोथरा यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व कपाटाच्या लॉकरमधील एका अल्युमिनियमच्या पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हडप केली. यात ३.७५ तोळ्याची सोन्याची मंगलपोत, ५ हजार किमतीचे तीन जोड चांदीचे पैंजण, २० हजार रोख असा १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Bravery theft all day in Pachora, Lampas looted Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.