भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 05:45 PM2020-10-12T17:45:47+5:302020-10-12T17:45:52+5:30

मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता.

BJP should not talk about women's dignity; Shivsena Leader Gulabrao Patil's target | भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा

भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा

Next

जळगाव:  केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या  हरसिम्रत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला. त्यांचा सन्मान झाला नाही. भाजपाच्या महिला आघाडीने त्यांच्यासाठी आंदोलन केले पाहिजे होते.  स्वत:ला महिलांचा सन्मान करता येत नाही, हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली आहे. 

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर सोमवारी भाजपकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला धरून गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली. सोमवारी दुपारी जळगावात असताना अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा यावेळी गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे.

 मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. पण बुलेट ट्रेन अहमदाबाद का झाली, असा आमचा विषय होता. आता मुंबईतील कारशेडच्या बाबतीत ते काही म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर लोकांसाठी काही गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजेत. पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक जे वातावरण आहे, ते टिकवणे महत्त्वाचे आहे. आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी अशी कोणतीही जागा उपलब्ध नाही. आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या विषयांना आमचा विरोध

सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विषयावरही त्यांनी मत मांडले. ते म्हणाले, नवीन कृषी कायद्यात काही मुद्दे चांगले आहेत तर काही मुद्दे चुकीचे आहेत. या विषयावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. जे मुद्दे चांगले आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण ज्यामुळे शेतकरी रस्त्यावर येतील, शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशा विषयांना आमचा कायम विरोध असेल, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: BJP should not talk about women's dignity; Shivsena Leader Gulabrao Patil's target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.