vidhan sabha 2019 : ‘जळगाव शहर’च्या जागेवर भाजप आणि सेनेचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:00 PM2019-09-22T13:00:52+5:302019-09-22T13:01:49+5:30

चुडामण बोरसे जळगाव - विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. आता जळगाव शहर मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

BJP and army claim on Jalgaon city | vidhan sabha 2019 : ‘जळगाव शहर’च्या जागेवर भाजप आणि सेनेचाही दावा

vidhan sabha 2019 : ‘जळगाव शहर’च्या जागेवर भाजप आणि सेनेचाही दावा

Next

चुडामण बोरसे
जळगाव- विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. आता जळगाव शहर मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
जळगाव शहर मतदार संघ हा युतीमधील शिवसेनेकडे आहे. गेल्या वर्षी युती तुटली आणि भाजपकडून सुरेश भोळे आणि शिवसेनेकडून सुरेशदादा जैन हे रिंगणात होते. यात भोळे यांनी बाजी मारली. आता पुन्हा ते या निवडणुकीसाठी शड्डू ठोकून उभे आहेत. दुसरीकडे युती होईल अथवा नाही, युती झाल्यास हा मतदार संघ कुणाला सुटणार? याविषयी याचीही चर्चा सुरु झाली आहे.
युती न झाल्यास भाजपतर्फे भोळे यांना संधी मिळू शकते तर शिवसेनेतर्फे माजी महापौैर विष्णू भंगाळे अथवा नगरसेवक सुनील महाजन यांची नावे चर्चेत आहेत. युती झाल्यास शिवसेना ही जागा सहजासहजी सोडेल, असे वाटत नाही. कारण सेनेचा हा पारंपारिक मतदार संघ आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसापूर्वी ज्या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले आहेत, त्या जागा भाजपकडे कायम राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे भोळे यांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जळगावात आली होती. त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भोळे यांना उद्देशून मामा तुम्ही तिकिटाची चिंता करु नका.. तिकिट मामींनाही मिळू शकते, असे सांगून टाकले होते.
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीतही जळगाव शहराची जागा काँग्रेसकडे आहे. या पक्षाकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. कुणालाही किती जागा मिळाव्यात यावरुन या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. समोरच्या पक्षाची ताकद कमी आहे... हे दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष सांगू लागले आहेत. त्यावरुन पक्षाच्या ताकदीची कल्पना येते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत वेळी मनसेचे इंजिनही जोरात होते. मनसेचे ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. कारण त्यावेळी मनसेत असलेले ललित कोल्हे हे आता भाजपमध्ये तर त्यांचे सहकारी अनंत जोशी हे शिवसेनेत आहेत.
याशिवाय आप, वंचित आघाडीही तयारीत आहेत. पण त्यांची ताकद मर्यादीत आहे. त्यामुळे लढत झाल्यास भाजप- शिवसेना अशी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेतर्फे विष्णू भंगाळे यांनी मुलाखत दिली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास एकाच कुटुंबातील दोन सदस्य आमने- सामने असतील. या लढतीसाठी भंगाळे यांना घरातून होकार देण्यात आल्याची माहिती मिळाली.
 

Web Title: BJP and army claim on Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.