भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:08 PM2019-11-10T15:08:12+5:302019-11-10T15:09:47+5:30

दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

In Bhusawal taluka, panchanamas of crops of over 3,000 hectares are completed | भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

Next
ठळक मुद्देआज पंचनामे पूर्ण होणारज्वारी, कपाशी पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
दिवाळी होताच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावे, असा आदेश शासनाने दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाने तालुक्यात पंचनामे करण्यास प्रारंभ केला. ९ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे, तर अद्याप पाचशे-सहाशे हेक्टरवरील शेतांमधील पंचनामे बाकी आहेत.
तालुक्यात बागायत कपाशी एक हजार ५०० हेक्टर, जिरायत कपाशी ११ हजार हेक्टर, ज्वारी सात हजार हेक्टर, सोयाबीन दोन हजार २०० हेक्टर, मका एक हजार ८००, तर कांदा ३३० हेक्टर असे नुकसान झाले आहे. एकूण २४ हजार हेक्टरवर पंचनामे करण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशानंतरही कुºहे (पानाचे) येथील तलाठी मेश्राम यांनी कार्यालयात बसून पंचनामे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार शेतकºयांनी हाणून पाडला, तर वांजोळा येथील ज्वारी, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे एका शेतकºयाने ज्वारीच्या गंजीला आग लावून संताप व्यक्त केला.
यावर्षी जून महिन्यात २० तारखेनंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीनही महिन्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकेही समाधानकारक होती. मात्र पोळा सणाच्या दरम्यान सततच्या पावसाने उडीद व मूग शेतकºयांच्या हातचे गेले. मात्र ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिके समाधानकारक दिसत होती. दोन वर्षाच्या दुष्काळानंतर हिरवी पिके पाहून शेतकरी सुखावला होता. मात्र दिवाळीतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे १५ दिवसांच्या कालावधीत कापलेल्या ज्वारी व मक्याला जमिनीवरच कोंब आले, तर वेचणीला आलेल्या कपाशीच्या बोंडामधूनही अंकूर बाहेर आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत शासनाकडून तरी काही नुकसान भरपाई मिळणार का, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

Web Title: In Bhusawal taluka, panchanamas of crops of over 3,000 hectares are completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.