भुसावळात नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने लक्षणे नसलेले ५१८ नागरिक ‘होम क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:27 PM2020-09-17T18:27:32+5:302020-09-17T19:05:10+5:30

नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेत तब्बल ५१८ कोरोना बाधित सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनसाठी यशस्वी पुढाकार घेतला आहे.

Bhusawal Corporator Nirmal Kothari's Initiative | भुसावळात नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने लक्षणे नसलेले ५१८ नागरिक ‘होम क्वारंटाईन’

भुसावळात नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने लक्षणे नसलेले ५१८ नागरिक ‘होम क्वारंटाईन’

googlenewsNext

भुसावळ : शहरात कोरोना बाधित रुग्णांनी सव्वादोन हजारांचा आकडा पार केला आहे, अशात गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, अत्यावश्यक रुग्णांना उपचार मिळावे व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनची परवानगी मिळावी व त्यांचा मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशातून नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेत तब्बल ५१८ कोरोना बाधित सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनसाठी यशस्वी पुढाकार घेतला आहे.
परप्रांतीय नागरिकांसह लॉकडाऊन काळात सर्वांना घरपोच फुड पॅकेटची व्यवस्था असो की बाधित रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्याचा विषय सर्व बाबतीत नेहमी अग्रेसर असलेले कोठारी यांनी सध्या सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी द्यावी याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ.देवर्षी घोषाल, डॉ.विक्रम सोनार यांची भेट घेऊन भुसावळचा आकडा वाढता पाहता कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेले बेड हे अति आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी वापर करावा व ज्यांना सौम्य लक्षणे असतील त्यांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी द्यावी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर कोठारी यांनी गेल्या काही दिवसात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रेल्वे हॉस्पिटल केअर सेंटरमधून ५१८ सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी मिळवून दिलेली आहे. यासाठी त्यांना गजानन चव्हाण, तेजस आंबेकर, साई सेवा समिती सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.
शहरात सव्वादोन हजारावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २५ टक्के रुग्ण हे ‘होम क्वारंटाईन’ आहेत. शासकीय कागदाची जुळवाजुळव करताना असताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार दीपक धिवरे, संबंधित तलाठी, वैद्यकीय अधिकारी सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले आहे.
 

Web Title: Bhusawal Corporator Nirmal Kothari's Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.