Beating a student and stealing money | विद्यार्थ्याला मारहाण करुन पैसे हिसकावले
विद्यार्थ्याला मारहाण करुन पैसे हिसकावले

जळगाव : शिरसोली रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या मोहित किशोर भोळे (१९, रा. वाघ नगर) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा चालकाने उतरवून मारहाण केली आणि त्याच्याजवळील पाचशे रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी शिरसोली रोडवर घडली. दरम्यान, या घटनेनंतर मोहीत याने पोलिसांकडे धाव घेतली असता त्याला टोलवाटोलवी करण्यात आली.
याबाबत मोहित याने ‘लोकमत’ जवळ आपबिती कथन केली. मोहीत हा गुलाबराव देवकर अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. डीप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. गुरुवारी तो देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात बोर्ड प्रमाणपत्र घेण्यासाठी गेला होता. तेथून दुपारी १२.३० वाजता रिक्षाने (क्र. एम.एच.१९ वाय झेड.६०९६) शहरात आला. रिक्षा काव्यरत्नावली चौकाकडे जात असल्याने तो डी मार्टजवळ उतरला. चालकाला पाचशे रुपयाची नोट दिली असता चालकाने सुट्टे नाहीत का? असे विचारले, त्यावर मोहीत नाही म्हटला असता चालकाने त्याच्या कानशिलात लगावली. पाचशेची नोट हिसकावून घेत ‘तुझ्याने जे होईल ते करुन घे’अशी धमकी देत तेथून पळून गेला. या रिक्षात मागे आणखी मद्याच्या नशेत दोघं जण होते. ते चालकाचे परिचयाचे होते.
 

Web Title:  Beating a student and stealing money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.