केबल मजुरांना रांजणीच्या व्यावसायिकाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:38 PM2020-04-01T15:38:00+5:302020-04-01T15:39:25+5:30

शेतात थांबलेल्या कुटुंबांना रांजणी येथील महेश अहिर यांनी अन्न धान्य व किराणा सामान देऊन मदतीचा हात दिला.

Assist the wrestling professional for cable workers | केबल मजुरांना रांजणीच्या व्यावसायिकाची मदत

केबल मजुरांना रांजणीच्या व्यावसायिकाची मदत

Next
ठळक मुद्देकंपनीच्या कामावरील मजूरठेकेदाराकडून मिळवून दिले पाच हजार

जामनेर, जि.जळगाव : जामठी बेटावद रस्त्यावरील शेतात थांबलेल्या कुटुंबांना रांजणी येथील मेडिकल दुकानदार महेश अहिर यांनी अन्न धान्य व किराणा सामान देऊन मदतीचा हात दिला.
एका कंपनीचे अंडरग्राउंड केबल खोदकाम करण्याचे काम करणाऱ्या या मजुरांना ठेकेदाराने कामाचे पैसे दिले नसल्याचे समजताच अहिर यांनी ठेकेदारांशी संपर्क साधला असता ठेकेदाराने कामगारांना पाच हजार रुपये दिले.
यावेळी जामठी येथील जितू पारधी, विनोद शिंदे, विकास पाटील, सचिन महाजन, गायकवाड, शकील व गुलाब पठाण यांनी मदत केली.

Web Title: Assist the wrestling professional for cable workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.