भुसावळ बसस्थानकावरून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:00 AM2019-09-17T00:00:57+5:302019-09-17T00:01:36+5:30

जळगाव - भुसावळ बसस्थानकावरून सैय्यद कामरान मसर्दद (रा़ मारूळ, ता़ यावल) या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बॅगेसह मोबाईल चोरणाºया मोहम्मद शाकीर ...

Arrested for extending mobile from Bhusawal bus station | भुसावळ बसस्थानकावरून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

भुसावळ बसस्थानकावरून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

Next

जळगाव- भुसावळ बसस्थानकावरून सैय्यद कामरान मसर्दद (रा़ मारूळ, ता़ यावल) या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बॅगेसह मोबाईल चोरणाºया मोहम्मद शाकीर सलीम शहा (१८, रा़ भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
यावल तालुक्यातील सैय्यद कामरान मसर्दद हा काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरात शैक्षणिक कामाकरिता आला होता़ दरम्यान, भुसावळ बसस्थानकावर असताना त्याची शैक्षणिक साहित्य असलेली बॅग व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला होता़ याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक चोरट्याचा शोध घेत होती़ अखेर शनिवारी भुसावळ शहरातून मोहम्मद शाकीर सलीम शहा या मोबाईल चोरट्यास पथकाने अटक केली आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरिक्षक डॉ़ बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील़ विनोद पाटील, अनिल देशमुख, सुधाकर अभोंरे, अनिल जाधव, अश्रफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर आदींनी केली आहे़

Web Title: Arrested for extending mobile from Bhusawal bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.