राष्ट्रीय जल पुरस्कारात आनोरे देशात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:49 PM2020-10-27T20:49:56+5:302020-10-27T20:53:27+5:30

संजय पाटील अमळनेर , जि. जळगाव :  पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार ...

Anore second in the country in the National Water Awards | राष्ट्रीय जल पुरस्कारात आनोरे देशात दुसरे

राष्ट्रीय जल पुरस्कारात आनोरे देशात दुसरे

Next
ठळक मुद्दे१०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डे करणारे गाव१२ महिने टँकर लागणारे गाव झाले समृद्धलॉकडाऊन काळात तालुक्याला भाजीपाला पुरवला

संजय पाटील
अमळनेर, जि. जळगाव : पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत राज्यात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ चे देशात दुसरे बक्षीस मिळाले असल्याचा मेल पंचायत समितीला प्राप्त झाला आगव. ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली मंत्रालयातून ऑनलाईन पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली.

      आनोरे गावाला सतत १२ महिने पाणीटंचाई असल्याने टँकर लागत होते. गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत भाग घेतला आणि एकजुटीने संपूर्ण गाव कामाला लागले होते. गावाने प्रत्येक घराला सारखा रंग देऊन त्यावर पाणी बचाव, सामाजिक, राष्ट्रीय संदेश रेखाटले होते. प्रत्येक घरातील व्यक्तीने एकाच दिवशी शोष खड्डा खोदून एकाच दिवसात काम पूर्ण केले होते. प्रत्येक घराच्या धाब्यावरील पाणी जमिनीत जिरवण्यात आले होते. १०० टक्के वॉटर हार्वेस्टिंग करणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. गावाची एकजूट एव्हडी होती की शेताची बांध बंदिस्ती व शेततळी सामूहिक रित्या तर खोदले त्यातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण तर झाले. मात्र आधी श्रमदान करून सामूहिकरित्या एकाचवेळी मतदान करण्याचा विक्रमही आनोरे गावाने केला आहे. एक घर एक झाड हा उपक्रम राबवून गावाच्या प्रवेश वाटेवरदेखील झाडे लावण्यात आली होती. 

   दोन वर्षात गाव एव्हडे समृद्ध झाले की, एकेकाळी १२ महिने टँकर लागणारे गाव लॉकडाऊन काळात अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवत होते. एव्हडे पाणी साचून बागायती व भाजीपाला उत्पन्न घेतले जात आहे. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. 

    जलमंत्रालयातर्फे देण्यात येणारा  राष्ट्रीय जल पुरस्कार  आनोरे गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरित होणार आहे.

राष्ट्रीय जल पुरस्काराच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आनोरे व वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुक  या दोनच गावांची निवड झाली होती. तेव्हा जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या वैज्ञानिक आतीरा आर. यांनी प्रत्यक्ष आनोरे येथे येऊन पाहणी केली होती.

Web Title: Anore second in the country in the National Water Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.