प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम पोस्टामार्फत निशुल्क मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:31 PM2020-08-12T20:31:45+5:302020-08-12T20:31:55+5:30

जळगाव - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सहावा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेची ...

The amount of Pradhan Mantri Kisan Sanman Yojana will be received free of cost through post | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम पोस्टामार्फत निशुल्क मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम पोस्टामार्फत निशुल्क मिळणार

googlenewsNext

जळगाव- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सहावा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता भारतीय डाक विभागाच्या ह्यइंडिया पोस्ट पेमेंट बँकेह्ण तर्फे सर्व लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी विशेष निशुल्क सुविधा देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बंकेमार्फत देण्यात येणाऱ्या aeps या सुविधेद्वारे लाभार्थी स्वतःच्या कोणत्याही बँक खात्यातील रक्कम पोस्ट ऑफिसद्वारे घेऊ शकतात. या सुविधेसाठी बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असणे बंधनकारक नाही.
पैसे काढण्यासाठी फक्त आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकाचा आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून पैसे काढता येतात. एकावेळी ग्राहक आपल्या खात्यातून जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढू शकतात. तसेच या सुविधेसाठी लाभार्थी फोनवरून संबंधित पोस्टमन यांना संपर्क करून ही सुविधा घरपोच देखील घेऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात पोस्ट विभागाच्या एकूण 458 शाखा ह्या ग्रामीण भागात व 77 शाखा ह्या शहरी तथा निमशहरी भागात कार्यरत आहेत.
तरी नागरिकांनी, विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी वरील सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन बँकांमध्ये होणारी गर्दी टाळावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Web Title: The amount of Pradhan Mantri Kisan Sanman Yojana will be received free of cost through post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.