पाचोरा- जळगाव रस्त्यावर रुग्णवाहिका कारवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:35 PM2021-04-10T22:35:13+5:302021-04-10T22:35:53+5:30

जळगाव- पाचोरा रस्त्यावर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व खासगी डाॅक्टर यांची कार तालुक्यातील हडसन गावाजवळ धडक झाली.

Ambulance hit car on Pachora-Jalgaon road, father and son injured | पाचोरा- जळगाव रस्त्यावर रुग्णवाहिका कारवर धडकली

पाचोरा- जळगाव रस्त्यावर रुग्णवाहिका कारवर धडकली

Next
ठळक मुद्देचालक व कारमधील डॉक्टर पिता-पुत्र जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरंगी, ता. पाचोरा : जळगाव- पाचोरा रस्त्यावर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व खासगी डाॅक्टर यांची कार तालुक्यातील हडसन गावाजवळ धडकल्याने नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक व कारमधील डॉक्टर पिता-पुत्र जखमी झाले आहेत.

जळगाव येथून पाचोराकडे निघालेल्या डॉ. नंदकिशोर पिंगळे व त्यांचा मुलगा कारने पाचोरा येथे येत असताना नांद्रा गावाच्या पुढे व हडसन गावाच्या ५०० मीटर अंतरावर नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (एमएच १९/९२५६ ) ही पाचोरा येथून नांद्राकडे येत असताना समोरून येणाऱ्या कारवर धडकली. या अपघातात अल्टो कार (एमएच१९/एएक्स ५४९४)मधील डॉक्टर पिता-पुत्र जखमी झाले. त्यांना पाचोरा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले तर रुग्णवाहिकाचालक किरण निंबा पाटील यांना तोंडावर मार लागल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Ambulance hit car on Pachora-Jalgaon road, father and son injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.