अमळनेरच्या महिलेची तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 11:01 PM2020-10-25T23:01:51+5:302020-10-25T23:03:00+5:30

महिलेने तलावात आत्महत्या केली.

Amalner's wife commits suicide in lake | अमळनेरच्या महिलेची तलावात आत्महत्या

अमळनेरच्या महिलेची तलावात आत्महत्या

Next


अमळनेर : येथील समर्थ नगरमधील पद्मावती अपार्टमेंटमधील दीपाली गुणवंत पवार या महिलेने २५ रोजी जैतपिर येथे दुचाकी उभी करून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दीपाली पवार ही महिला एमएच
-१९-बीएच-६७६९ क्रमांकाची दुचाकी घेऊन आली आणि तलावाच्या काठी उभी करून सरळ तलावात उडी घेतली. योगेश धनराज बागुल यांनी ही घटना पाहिली व पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कळवली. त्यांनी संतोष कोळी व महेंद्र पाटील यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. मारवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.

Web Title: Amalner's wife commits suicide in lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.