खेडी येथे प्रौढाला तिघांकडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:15 AM2021-05-17T04:15:14+5:302021-05-17T04:15:14+5:30

जळगाव : खेडी येथे काहीही कारण नसतांना विजय पाडूंरग मराठे (वय ४५, रा. खेडी बुद्रुक) यांना तिघांनी बेदम मारहाण ...

An adult was beaten to death by three persons at a village | खेडी येथे प्रौढाला तिघांकडून बेदम मारहाण

खेडी येथे प्रौढाला तिघांकडून बेदम मारहाण

Next

जळगाव : खेडी येथे काहीही कारण नसतांना विजय पाडूंरग मराठे (वय ४५, रा. खेडी बुद्रुक) यांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेश उर्फ मेंबर कोळी (रा. अयोध्या नगर) याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश कोळी याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

विजय पाडूंरग मराठे हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. १५ मे रोजी रात्री भुसावळ रोडवरील नूपूर हॉटेलजवळ घरी जात असतांना गणेश उर्फ मेंबर कोळी (रा.अयोध्यानगर), बबलू कोळी आणि मनोज सपकाळे (दोन्ही रा.जैनाबाद) यांनी काहीही कारण नसतांना विजय मराठे याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तिघांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असतांना विजय मराठे व त्याचा भाऊ सचिन मराठे यांना अडवून पोलिसात तक्रार दिली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजय मराठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

Web Title: An adult was beaten to death by three persons at a village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.