Aditya Thakre, author of the Nangarafal Kavitha, written by poet Ramesh Patil, published in Chopda | कवी रमेश पाटील लिखित नांगरफाळ काव्यसंग्रहाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चोपड्यात प्रकाशन
कवी रमेश पाटील लिखित नांगरफाळ काव्यसंग्रहाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चोपड्यात प्रकाशन

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांनी लिहिलेल्या नांगरफाळ या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १८ रोजी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार चंद्रकांत सोनवणे, संपर्कप्रमुख उषा दराडे, संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, उपसभापती एम.व्ही.पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील, भरत बाविस्कर, आबा देशमुख, महेश पवार, राजाराम पाटील, किशोर चौधरी, महेंद्र धनगर आदी उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी रमेश जे.पाटील यांच्याशी बोलताना सांगितले की, तुम्ही शेतकऱ्यांबाबत कविता लिहता हे मोठे भाग्य आहे. शेतकºयांच्या व्यथा तुमच्या कवी मनाला कळतात हेच मिशन सेनेचे कायम राहिले आहे.


Web Title: Aditya Thakre, author of the Nangarafal Kavitha, written by poet Ramesh Patil, published in Chopda
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.