यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 02:06 AM2020-10-16T02:06:34+5:302020-10-16T02:10:36+5:30

एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला

A 49-year-old man died after falling from a travel bus in Yaval | यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

Next

यावल : शहरातील एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे असुन या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी वय ४९ हे दररोज यावल येथून धावणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसेसव्दारे केळीचे पान पुणे पाठवण्याचा व्यवसाय करतात.

 दि. १५ आॅक्टोबर गुरुवार रोजी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर ट्रव्हल्स क्रमांक एम. एच. १९ वाय. ६१११ ही उभी होती. तेव्हा रोजच्याप्रमाणे उभ्या असलेल्या या बसवरील टपावर चढुन कॅरीअरवर बारी हे केळीचे पानाचे गठ्ठे बांधत होते.

बारी हे पुणे येथे संगमवाडीमधील नातेवाईक आशा संतोष बारी यांच्या कडे पाठवत असत. मात्र चार वाजेच्या सुमारास बसच्या कॅरीवर केळी गठ्ठे टाकून बांधत असतांना अचानक खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली हा प्रकार लक्षात येताच त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र रस्त्याचं त्यांची प्राणज्योत मालावली. या प्रकरणी यावल पोलिसात बस चालक तेजस लहू पाटील रा. अमळनेर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे. मयत बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्यांच्या अशा अपघातील निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A 49-year-old man died after falling from a travel bus in Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.