जळगाव जिल्ह्यातील २३ कर्मचारी झाले फौजदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:11 PM2020-10-20T22:11:35+5:302020-10-20T22:12:37+5:30

Police : पोलीस महासंचालक कायार्लयातील आस्थापणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले. 

23 employees from Jalgaon district become faujdars! | जळगाव जिल्ह्यातील २३ कर्मचारी झाले फौजदार!

जळगाव जिल्ह्यातील २३ कर्मचारी झाले फौजदार!

Next
ठळक मुद्दे१९८८ पर्यंत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर ही नियुक्ती देण्यात आली आहे.

जळगाव : राज्य शासनाने २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील १०६१ जणांना फौजदार केले असून त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातील २३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक कायार्लयातील आस्थापणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले. अनेक वषार्पासून या कर्मचाऱ्यांचा लढा सुरु होता. उच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते. १९८८ पर्यंत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर ही नियुक्ती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील राजाराम धमार् भोई, अंबादास नारायण पाथरवट, गोकुळसिंग नगीनसिंग बयास, राजू दशरथ मोरे, सुनील जगन्नाथ वाणी, रवींद्र मानसिंग गिरासे, रामकृष्ण पंढरीनाथ पाटील, कल्याण नाना कासार, प्रदीप पंढरीनाथ चांदोलकर, राजेंद्र दामू बोरसे, मगन पुंडलिक मराठे, चंद्रसिंग गुलाबसिंग पाटील, नरसिंग ताराचंद वाघ, मोहन गिरधर लोखंडे, गंभीर आनंदा शिंदे, शेख मकसूद शेख बशीर, इरफान काझी, सुनील श्यामकांत पाटील, चंद्रकांत भगवान पाटील, अरुण आनंदा सोनार, राजेंद्र भास्कर साळुंखे, किशोर रामचंद्र पाटील व चंद्रकांत बुधा पाटील यांचा समावेश आहे.

Web Title: 23 employees from Jalgaon district become faujdars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.