दोन पोलीस अधिकाऱ्यासह आढळले २३ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:42 PM2020-06-30T12:42:02+5:302020-06-30T12:42:29+5:30

शहराची रुग्णसंख्या ७२८ वर

23 corona found with two police officers | दोन पोलीस अधिकाऱ्यासह आढळले २३ कोरोना बाधित

दोन पोलीस अधिकाऱ्यासह आढळले २३ कोरोना बाधित

Next

जळगाव : शहरातील एका पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यासह शहरात सोमवारी २३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या ७२८ वर पोहोचली आहे़
दोघेही पोलीस हे बाधितांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती आहे़ कोरोना योद्धा दिवसेंदिवस कोरोनाच्या कचाट्यात सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आह़े जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येपैकी २१ टक्के रुग्ण हे जळगाव शहरातील असल्याची माहिती आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सोमवारी बैठकीत दिली़ क्वारंटाईन सेंटरमध्ये ६१० बेडची व्यवस्था आहे़ यासह कोविड केअर सेंटरमध्ये तीन इमारतीत ३०० बेडची व्यवस्था असून त्या ठिकाणी १६३ रुग्ण असून त्यातील १२६ रुग्ण हे शहरातील व उर्वरित ग्रामीण भागातील असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली़
जिल्ह्यात ९ जणांच्या मृत्यूची नोंद
चाळीसगाव तालुक्यातील ७५ वर्षीय वृद्ध, रावेर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, ६५ वर्षीय वृद्ध, चोपडा तालुक्यातील ७५ वर्षीय दोन वृद्ध महिला, पारोळा तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्ध, जळगाव व भुसावळ तालुक्यातील अनुक्रमे ८० वर्षीय व ७५ वर्षीय वृद्ध यांच्या मृत्यूची सोमवारी नोंद करण्यात आली आहे़ यात एक मृत्यू हा बाहेरील जिल्ह्यात झाला आहे़
या भागात आढळले रुग्ण
वाल्मीक नगर, तानाजी मालुसरे नगर, आसोदा रोड, कांचननगर, चौघुले प्लॉट प्रत्येकी २, दत्तनगर मेहरूण, मकरंद कॉलनी महाबळ, श्रीकृष्ण हाईट्स प्रेम नगर, विवेकानंद नगर, द्वारका नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़
७५० अहवाल प्राप्त
गेल्या दोन दिवसांपासून ६००च्या वर अहवाल प्राप्त होत आहे़ सोमवारी एकाच दिवसात ७५० अहवाल प्राप्त झाले़ यातील ५८९ अहवाल हे निगेटीव्ह आहेत़ प्रलंबित अहवाल ३७२ आहेत़
ममुराबादला आढळला चौथा रुग्ण
ममुराबाद उमानगर भागातील तरुणाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता चार झाली आहे, अशी माहिती धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बारी यांनी दिली. बसस्थानक परिसरातील उमानगर भागात राहणाºया तरुणामध्ये दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाº्यांनी त्यास जळगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या बाधिताच्या संपर्कातील अतिजोखिम स्तरावरील अन्य चार जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

Web Title: 23 corona found with two police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव