चुंचाळे येथील २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:32 PM2020-07-30T17:32:23+5:302020-07-30T17:32:47+5:30

एका २० वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणीने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

20-year-old newlywed commits suicide in Chunchale | चुंचाळे येथील २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

चुंचाळे येथील २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

Next

चुंचाळे, ता.यावल : येथील एका २० वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणीने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजश्री अमृत पाटील असे तिचे नाव आहे.
तिचे कुटुंबासोबत आणि इतर कोणतेही भांडण-तंटा नसताना बुधवारी रात्री तिच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. पती घरात झोपलेला असतानाच घटना घडली. पती लघुशंकेला उठला. तेव्हा घटना लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ यावल पोलीस स्टेशनला माहिती दिली. विवाहित गर्भवती तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणला व शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात घेऊन त्यावर चुंचाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास यावल पोलीस करत आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आठ दिवसापूर्वी गावातील जयसिंग विष्णू पाटील या व्यक्तीने चुंचाळे फाट्याजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा इसमसुद्धा आत्महत्याग्रस्त तरुण गर्भवती महिलेचा नातेवाईक होता. २८ जुलै रोजी आत्महत्याग्रस्त महिला तिच्या माहेरी आईला भेटण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणीसुद्धा गेल्या आठ दिवसापूर्वी फाशी घेतलेल्या व्यक्तीबाबत अनेकांनी चर्चा केली. त्यानंतर २९ रोजी दोघे पती-पत्नी यावल येथील एका डॉक्टरकडे सुरू असलेल्या औषधोपचारासाठी आले होते. यावरून चुंचाळे येथे परत जाताना चुंचाळे फाट्याजवळ आठ दिवसापूर्वी फाशी घेतलेल्या झाडाजवळ या पती-पत्नी थांबून चर्चा केली होती आणि त्याच रात्री तरुण गर्भवती महिलेने कोणतेही भांडण-तंटा नसताना आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबासह चुंचाळे ग्रामस्थांसह संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे व घटनेबाबत चुंचाळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: 20-year-old newlywed commits suicide in Chunchale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.