जामनेरात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 03:13 PM2020-10-18T15:13:57+5:302020-10-18T15:27:35+5:30

गेल्या काही महिन्यांपासून शहरात सायकलींच्या मागणीत वाढ झाली आहे.

15 per cent increase in demand for bicycles in Jamnera | जामनेरात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ

जामनेरात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देव्यायामशाळा, जीम बंदचा परिणामतरुणांसह मध्यमवगीर्यांची पसंती

सय्यद लियाकत/मोहन सारस्वत
जामनेर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात सायकलींच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात सायकलींच्या मागणीत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागले. त्यामुळे नागरिक घरातच राहिले. तसेच या दरम्यान जीम व व्यायामशाळा बंद झाल्या होत्या. त्यामुळे व्यायाम कमी झाला व अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवायला लागल्या तसेच लॉकडाऊनच्या काळात आरोग्याबाबत बरीच जनजागृती करण्यात आली. सध्या पायी चालणे व सायकल चालविणे हाच पर्याय आहे. व्यायामशाळा व जीम अजूनही बंद आहेत. त्यामुळे तरुणांसह मध्यम वर्गीयही सायकल चालविण्याला पसंती देत आहेत. गत तीन महिन्यात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ झाल्याचे शहरातील सायकल विक्रेत्यांनी सांगितले.
पायी फिरायला महिला वर्गातही वाढ
मार्च महिन्यापासूम कोरोना महामारीमुळे व झालेल्या लॉकडाऊनमुळे महिलावर्ग यांनासुद्धा कोंडी झाल्यासारखी वाटायचे. कुठे येऊ नये, कुठे जाऊ नये त्यामुळे त्यांना मानसिक तणाव, आजारासारखा समस्या निर्माण झाल्या. मात्र त्यांनीसुद्धा सकाळी व संध्याकाळी जळगाव रोड, वाकी रोड, सोनबर्डी, भुसावळ रोड, हिवरखेडा रोड, पाचोरा रोड, बोदवड रोड या परिसरात पायी फिरायला सुरवात केली आहे. त्यांनी आपल्या आरोग्यबाबत चांगलीच काळजी घेतलेली दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये महिला वर्गातही फिरणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
महागड्या सायकलींची मागणी
सध्या ४ हजारांपासून तर ४० हजारांपर्यंतच्या सायकली उपलब्ध आहेत. हायब्रीड, न्यू मॉडेल्ससह गिअरच्या ६० हजारांपर्यंतच्या सायकली खरेदी करणारेही ग्राहक आहेत. सर्वाधिक मागणी ४ ते १० हजारांपर्यंतच्या सायकलींना आहे.


सध्या लहान मुलांच्या सायकली विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच तरुण व मध्यमवर्गीयांमध्येसुध्दा सायकल घेण्याचा कल वाढला आहे.
-मयूर जैन, सायकल विक्रेते, जामनेर

Web Title: 15 per cent increase in demand for bicycles in Jamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.