11 people arrested for clashing in Jalgaon highway | जळगावात महामार्गावर दोन गटात हाणामारी करणाºया ११ जणांना अटक
जळगावात महामार्गावर दोन गटात हाणामारी करणाºया ११ जणांना अटक

ठळक मुद्देरात्रीच्यावेळी धिंगाणा पोलिसांनीच दिली फिर्याद

जळगाव : महामार्गावर अजिंठा चौक परिसरात आॅटो नगराजवळ एका हॉटेलच्या बाहेर आपसात झोंबाझोंबी आणि हाणामारी करणा-या ११ जणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता अटक केली. ८.३० वाजता झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विजय कमलाकर सपकाळे (२२) रोहीत नरेंद्र कोळी (२०), रा.तानाजी मालुसरे नगर, निलेश प्रभाकर सपकाळे (१९) वैभव माणिक मिस्तरी (२१) रा.आयोध्या नगर, हर्षल रवींद्र सोनवणे (२०), भूषण विलास सपकाळे (२२), विनायक जनार्दन साळुंखे (१९), धीरज मंगलसिंग कोळी (१९), पंकज विलास कोळी (२२, रा.तळेले कॉलनी), अतुल भगवान पाटील (२३, रा.मेस्को माता नगर) व गोवर्धन अरुण चौधरी (३२) यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी दीपक चौधरी यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मनोज सुरवाडे, किशोर पाटील व मिलिंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Web Title: 11 people arrested for clashing in Jalgaon highway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.