८ ‘चेकपोस्ट’वर पोलीस करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:52 PM2019-09-21T23:52:04+5:302019-09-21T23:52:38+5:30

जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ सुरू केले जाणार आहेत.

 तपासणी Police inspection at 'checkpost' | ८ ‘चेकपोस्ट’वर पोलीस करणार तपासणी

८ ‘चेकपोस्ट’वर पोलीस करणार तपासणी

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ सुरू केले जाणार आहेत. तर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘नाकाबंदी’ ९कली जाणार असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
निवडणुका म्हटलं की साम, दाम, दंड, भेद आदी तत्त्वांचा वापर करून राजकीय पुढारी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र धडपड करीत असतात. त्यात अर्थकारणालाही अधिक महत्त्व येते. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत पैशांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ तयार केले जाणार आहेत. शिवाय शहरी, ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘नाकाबंदी’ केली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार असून, छायाचित्रीकरणात वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
या वाहनांमध्ये पैसे, हत्यारे किंवा इतर अवैध साहित्य आढळून आले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
निवडणूक कालावधीत निवडणूक विभागाकडूनही विविध पथके नियुक्त केली जातात. अशा पथकांमध्येही मागणीनुसार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत केले जाणार आहेत. विशेषत: ठाणेस्तरावरील रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात वाढीव पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. नागरिकांनीही आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुन्हेगारांवर नजर
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. आजवर एमपीडीए अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती ठाणेस्तरावरून मागविण्यात आली आहे. या माहितीनंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक व इतर प्रकारच्या कारवाया केल्या जाणार आहेत. याशिवाय ठाणे प्रभारींनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच ठाणे प्रमुखांची बैठकही पोलीस अधीक्षक घेणार आहेत.

Web Title:  तपासणी Police inspection at 'checkpost'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.