कर्ज न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:29 AM2020-02-14T00:29:44+5:302020-02-14T00:29:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने ...

Special scheme for farmers in non-loaned districts | कर्ज न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

कर्ज न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने कर्ज दिले नाही, अशा शेतक-यांसाठी ८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत विशेष कर्ज पुरवठा मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यासंदर्भात गुरूवारी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील या योजनेसंदर्भात माहिती दिली. या योजनेंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतक-यांसाठी ही कर्ज पुरवठा योजना असून, या अंतर्गत सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित शेतक-यांनी बँकांना आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे विहित नमुन्यात उपलब्ध करून दिल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाच्या मर्यादेत राहून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला असता एकूण महसूल नोंदीप्रमाणे ५ लाख ३८ हजार शेतकरी आहेत. त्यातील ३ लाख ५५ हजार शेतक-यांकडे किसान कार्ड यापूर्वीच उपलब्ध आहेत. परंतु, १ लाख ७० हजार शेतक-यांनी अद्यापही किसान कार्ड काढलेले नसल्याचे दिसून आले.
या वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत किसान कार्ड देऊन त्यांना पीककर्ज देण्यासाठीची ही योजना आहे. यासाठी सर्व बँकांनी अशा शेतक-यांना मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यापूर्वीच घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्याचे परळीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे प्रबंधक पी.जी.भागवतकर, मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशितोष देशमुख, सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक सूर्यकांत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कर्जमुक्ती : १२३९ कोटींचा लाभ मिळणार
शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ६६८ शेतकरी पात्र आहेत. त्यासाठी जिल्ह्याला १२३९ कोटी ७८ लाख रूपये मिळणार आहेत. त्यात जिल्हा बँकेकडे ४६ हजार ६२५ शेतकरी असून, त्यांना १०१ कोटी ८४ लाख रूपये वर्ग करण्यात येतील.
४यासह विविध राष्ट्रीय्ीाकृत बँकांमधील शेतकºयांची संख्या १ लाख ९ हजार ३३७ एवढी आहे. त्या शेतक-यांना ८७९ कोटी ९४ लाख रूपये मिळतील. तर ग्रामीण बँकेकडे ३४ हजार ९२६ शेतकरी असून, त्यांना २६८ कोटी रूपये वर्ग करण्यात येणार आहेत.
दीड लाख शेतक-यांची माहिती अपलोड
शासनाच्या कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत कर्ज खात्याशी आधार लिंक केलेल्या दोन लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या १ लाख ७७ हजार २२८ शेतक-यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Special scheme for farmers in non-loaned districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.