धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 08:56 AM2020-11-19T08:56:48+5:302020-11-19T08:57:10+5:30

पिकाला पाणी देण्यास गेले होते तिघे भाऊ

Shocking! Three brothers drowned in a well; Incidents in Jalna district | धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना

धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना

Next
ठळक मुद्देएकाचा 3 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

भोकरदन : तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती असून यातील एकाचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

पाळसखेड पिंपळे येथील ध्यानेश्वर आप्पासाहेब जाधव (26), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (26) व सुनील आप्पासाहेब जाधव (18)  हे तिघे भाऊ बुधवारी रात्रीचे जेवण करून 8 वाजेच्या दरम्याब शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी लागकीच विहिरीत उडी घेतली.  मात्र,तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

रात्री उशीर झाला तरी तिघे घरी परतले नाही म्हणून जाधव कुटुंबीय चिंतेत पडले. मोबाईलवरील कॉल सुद्धा कोणीही उचलत नव्हते म्हणून त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांनी घटनास्थळी पाहणी केली. 

तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी धानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. इतर दोन मुले औरंगाबाद येथे कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनपासून ते घरी आले होते. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Shocking! Three brothers drowned in a well; Incidents in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.