Sanjana Jaiswal Gold Medal | संजना जयस्वालला सुवर्णपदक
संजना जयस्वालला सुवर्णपदक

जालना : जालना येथील तरूण खेळाडू संजना जयस्वालने नुकत्याच उत्तराखंडमधील कोसी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. यासाठी तिने १२४ पॉइंट मिळवले आहेत.
या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण ९२ खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून जालन्याची संजना जयस्वाल ही एकमेव खेळाडू होती. या स्पर्धेत येत्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धा रशियात होणार आहे. त्यासाठी या खेळांडूमधून भारतीय संघाची निवड होणार असून, त्यात संजनाचे स्थान निश्चत मानले जात आहे.
यापूर्वी ही संजनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नैपुण्य सिध्द केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.
कोसी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील क्रॉसबो स्पर्धेत लखनऊ येथील अंकुर राऊत हा देखील संजना सोबतच्या संघात होता. त्यालाही सुवर्णपदक मिळाल्याचे सांगण्यात आले. आगामी रशिया दौऱ्यातही देशासाठी सुवर्णपदक आणण्याचे ध्येय असून, त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे संजनाने सांगितले.


Web Title: Sanjana Jaiswal Gold Medal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.