Sand smugglers walk game at night! | रात्रीस खेळ चाले वाळू तस्करांचा ...!
रात्रीस खेळ चाले वाळू तस्करांचा ...!

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : पोलिसांनी कारवाया करूनही शहागड, वाळकेश्वर पुलाखालील व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पायथ्याची अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रात्री सुरूच आहे.
दोन दिवसांपूर्वी पोउपनि. हनुमंत वारे यांनी भर पावसात गोदापात्रात जाऊन नागझरी, खामगाव, गेवराई येथील अवैध वाळू वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर जप्त करून पाच तस्करांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईला दोनही दिवस पूर्ण झाले नाहीत. मात्र, अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर येथून मध्यरात्री तर पहाटे येडशी- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जोडणा-या पुलाखालून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे.


Web Title:  Sand smugglers walk game at night!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.