कारमधून तलवार नेणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:27 AM2020-02-14T00:27:20+5:302020-02-14T00:27:36+5:30

कारमधून तलवार नेणाऱ्याविरूध्द चंदनझिरा पोलिसांनी कारवाई के

Police take the sword from the car | कारमधून तलवार नेणारा पोलिसांच्या ताब्यात

कारमधून तलवार नेणारा पोलिसांच्या ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कारमधून तलवार नेणाऱ्याविरूध्द चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली असून, कारसह तलवार असा एकूण ७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे व त्यांचे सहकारी गुरूवारी सकाळी गस्तीवर होते. त्यावेळी पोलिसांची जीप पाहून एकाने त्याची कार (क्र.एम.एच.२१- ए.जी.६७७७) भरधाव वेगात पुढे नेली. पोलिसांना त्याचा संशय आल्याने पाठलाग करून त्याला नवीन जालना मोंढा येथे थांबविण्यात आले. कारची तपासणी केली असता आतमध्ये पिवळ्या धातूची मूठ असलेली लाल रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेली साडेतीन फूट लांबीची तलवार आढळून आली. चालक संतोष सुभाषलाल जैस्वाल (रा. इंदेवाडी ता. जालना) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तलवारीसह कार जप्त केली असून, या प्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष जैस्वाल विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि सांडू पठाण हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. एस. कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोउपनि सांडू पठाण, कर्मचारी अनिल काळे, गोविंद पवार, मच्छिंद्र निकाळजे आदींनी केली.

Web Title: Police take the sword from the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.