लायन्स क्लबच्या उपक्रमांना एकशे पाच वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:28+5:302021-08-02T04:11:28+5:30

जालना : दुःखी, वंचित व गरजवंतांच्या सेवेत सातत्याने कार्यशील असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लायन्स क्लबला एकशे पाच वर्षांच्या सेवेचा गौरवशाली ...

One hundred and five years history of Lions Club activities | लायन्स क्लबच्या उपक्रमांना एकशे पाच वर्षांचा इतिहास

लायन्स क्लबच्या उपक्रमांना एकशे पाच वर्षांचा इतिहास

googlenewsNext

जालना : दुःखी, वंचित व गरजवंतांच्या सेवेत सातत्याने कार्यशील असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लायन्स क्लबला एकशे पाच वर्षांच्या सेवेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. लायन्सचे सेवाकार्य हे भगवंतास दाखवणाऱ्या प्रसादासारखे आहे, असे मत लायन्सचे प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ जालनाअंतर्गत डायमंड, प्रेसिडेंट, महाराजा व लिओ क्लबचा सहाव्या वर्षातील शपथविधी सोहळा शुक्रवारी सायंकाळी राजेंद्र बजाज यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. यानिमित्त आयोजित सिंहनाद सोहळ्यात जयपुरिया बोलत होते. यावेळी अतुल लढ्ढा, विजयकुमार बगडिया, क्लबचे संस्थापक सुभाष देवीदान, उद्योजक मनोहर सिनगारे, सौरभ पंच, सुनील बियाणी, जतीन अग्रवाल, डायमंडचे अध्यक्ष मोहन इंगळे, सचिव कृष्णा देवीदान, प्रेसिडेंटचे अध्यक्ष संतोष दुधानी, सचिव जितेंद्र लखोटिया, महाराजाचे अध्यक्ष ध्रुवकुमार अग्रवाल, सचिव अनिल अग्रवाल, लिओ डायमंडचे अध्यक्ष पवन झुंगे, प्रेसिडेंटचे अध्यक्ष देवराज कामड, महाराजाचे अध्यक्ष हर्ष भरतीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विजयकुमार बगडिया, सुभाष देवीदान, सुनील बियाणी, सौरभ पंच, जतीन अग्रवाल, पवन झुंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी राजेश पित्ती यांनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन स्मिता मित्तल व चंचल अग्रवाल यांनी केले, तर ललित बिजावत यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला मीनाक्षी दाड, कंचनदेवी देवीदान, अरुण मित्तल, श्यामसुंदर लोया, रामकुंवर अग्रवाल, पंकज गिल्डा, मधुकर पवार, द्वारकादास मुंदडा, हनुमान प्रसाद भारूका, सतीश संचेती, अनिल अग्रवाल, विकास शर्मा, जतीन गोयल, सिद्धार्थ संचेती, अक्षय भुरेवाल, शिवचरण झुंगे, ओम लोहिया, कृष्णा तापडिया, कपिल गज्वी, किरण खरात यांच्यासह लायन्स परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: One hundred and five years history of Lions Club activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.