सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:33 AM2019-05-08T00:33:48+5:302019-05-08T00:34:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे ...

The need for a time of mass wedding ceremony - Nana Patekar | सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे हा हेतू ठेवू नये, जेवढे आपल्या मुठीत बसते तेवढेच आपले असते, मुठीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जास्त असल्यास ते इतरांना द्यावे, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना देवाने चांगला पाऊस पाडून भरभरून द्यावे एवढेच आपण आकाशतील शक्तीकडे मागत असल्याचे सांगून नाना पाटेकर यांनी सर्वांना भावूक केले.
निमित्त होते ते येथील भाईश्री फाऊंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. मंगळवारी दानकुंवरच्या मैदानावर नाम फाऊंडेशन आणि भाईश्री परिवाराकडून ४८ जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. यावेळी प्रसिध्द कलावंत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.
पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी सांगिले की, समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत, ते सर्वांनी मिळून सोडवाच्या आहेत. त्यासाठीच आम्ही नाम फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यातून आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. गरिबांना दानशूर व्यक्तींकडून मोठी आशा असते, आणि येथे या सोहळ्यास भाईश्रींनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी मदत केल्याचे ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटल्याने पाटेकर म्हणाले.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत व्यासपीठावरील उपस्थित नव वधू-वरांनी त्यांच्या चेहºयावर हास्य आणावे, नंतर उद्यापासून तुमचे हास्य लोप पावेल असा सांगून गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी राम..राम.. मंडळी अशी हाक देऊन दोन्ही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले.
यावेळी नाम च्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २०० सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाम फाऊंडेशनचा सहभाग असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह चळवळ आता जोर धरू लागल्याचे समाधान व्यक्त केले. सोलापूर येथे एका मुलीच्या आई-वडिलांनी दहा हजार रूपये दिल्याची आठवण आपल्या मनात कोरल्याचे ते म्हणाले.
मैत्र मांदियाळीस ११०० क्विंटल तांदूळ
या सामूहिक विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतां ऐवजी गुलाब पुष्पाच्या पाकळ्या देण्यात आल्या होत्या. अक्षतांसाठी लागणारा तांदूळ हा वाया जातो. तो वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
ही बाब लक्षात घेऊन मैत्र मांदियाळीकडून ज्या गोरगरिबांना भोजन व्यवस्था केली जाते. त्यासाठी भाईश्री परिवाराकडून ११०० क्विंटल तांदूळ देण्यात आला. यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांचा नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

Web Title: The need for a time of mass wedding ceremony - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.