उत्सव साजरे करताना ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:47 AM2019-09-01T00:47:26+5:302019-09-01T00:48:53+5:30

भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.

Need to control noise pollution while celebrating | उत्सव साजरे करताना ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणाची गरज

उत्सव साजरे करताना ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणाची गरज

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्या पाठोपाठ नवरात्रोत्सव येतो. या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर, डी.जे. लावण्यावर मोठा भर असतो. परंतु, हे सर्व करत असताना यातून ध्वनिप्रदूषणही होते. हे टाळण्यासाठी भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये ही मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ध्वनिप्रदूषण नेमके काय आहे?
ज्या प्रमाणे डोळे, ह्दय हे अवयव महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे प्रत्येकाचे कान हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना बधिरता येण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी पूर्वी भारतीय संस्कृतीत मंगल वाद्य म्हणजेच वाजंत्रीला मोठे महत्त्व होते. आता लाऊडस्पीकरवरच भजन, कीर्तन करण्याची पध्दत रूढ झाली आहे. काळानुरूप ती खरीदेखील आहे. परंतु, त्याचा आवाजही तज्ज्ञांनी घालून दिलेल्या डेसिबलच्या निकषापेक्षा कमी ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही.
टाळण्यासाठी कोणते उपाय करावे?
आज प्रत्येक ठिकाणी शोर म्हणजेच आवाज ऐकू येतो. यामुळे कधी-कधी ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. मेंदूवर जास्त आवाजाचा ताण आल्यास कान निकामी होऊ शकतात. हे सर्व गंभीर मुद्दे टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. सण, उत्सव साजरे करताना मर्यादित राहूनच लाऊडस्पीकर अथवा डीजेचा आवाज ठेवावा.
विना हॉर्न सिटीची गरज
अनेक देशांमध्ये वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यावर पूर्णत: बंदी आहे. हीच पध्दत भारतात राबविणे गरजेचे असून, एक दिवस विना हॉर्नचे वाहन चालविण्याची चळवळ उभी व्हावी.
शासनाकडून मदत
आज अनेक गोरगरीब रूग्णांना कानावरील महागडी शस्त्रक्रिया अथवा डिजिटल श्रवण यंत्र देणे शक्य नाही. अशांसाठी इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून मदत मिळते. तसेच आम्ही देखील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून गोरगरीब रूग्णांना विशेष करून बाल रूग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करतो, ही काळाची गरज आहे.

Web Title: Need to control noise pollution while celebrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.