खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:32 AM2019-08-15T01:32:59+5:302019-08-15T01:33:42+5:30

एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै अखेरपर्यंत खुनाच्या २३ पैकी २२ घटनांची उकल झाली आहे. तर दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा तपास लागला

Murder; Robbery investigation successfully | खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’

खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासह गुन्ह्यांचा तपास वेळेत व्हावा, याकडे विशेष लक्ष दिले. एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै अखेरपर्यंत खुनाच्या २३ पैकी २२ घटनांची उकल झाली आहे. तर दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा तपास लागला आहे. अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या समाधान कक्षात दाखल १४४ पैकी ११७ तक्रारींचा निपटारा झाला आहे.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी गत वर्षी आॅगस्ट महिन्यात पोलीस दलाच्या कामकाजाची सूत्रे हाती घेतली. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरी, ग्रामीण भागात कोंबिंग आॅपरेशन, करून गस्तीत वाढ केली. तसेच इतर कारवाया ही करण्यात आल्या आहेत. विशेषत: राज्याचे लक्ष लागलेली जालना लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यात पोलीस दलाला मोठे यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा, एडीएस पथकासह ठाणेस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखल विविध गुन्ह्यांची उकलही केली आहे. जुलै अखेरपर्यंत खुनाचे २३ गुन्हे दाखल होते. पैकी २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा उलगडा झाला आहे. जबरी चोरीच्या ४९ पैकी २५ घटनांचा तर घरफोडीच्या १४२ घटनांपैकी २० घटनांचा उलगडा झाला आहे. इतर चो-यांच्या ५५१ घटना असून, २१७ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी इतरही विविध उपक्रम राबविले आहेत. पोलीस वसाहतीतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नवीन बोअर घेतला असून, पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविले जात आहे. पोलिसांची मुलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत, यासाठी स्पर्धा परीक्षेची
पुस्तके दिली आहेत. अधिका-यांच्या बदल्या एकाच वेळी करून पोस्टिंग दिले. विशेषत: सातव्या वेतन आयोगाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. कर्मचा-यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या समाधान कक्षात आॅनलाईन पध्दतीने ६६ तक्रारी दाखल झाल्या होत्या.
यातील ५८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर तक्रारदाराने कक्षात येऊन दिलेल्या ७८ तक्रारींपैकी ५९ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. इतर तक्रारींचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षातील बहुतांश खून, दरोड्यांची उकल पोलिसांनी केली आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेने परतूर, राजूर रोडवरील दरोड्यांच्या तपासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. परतूर दरोड्यात मुंबई कनेक्शन समोर आले होते. खादगाव येथील ट्रक चालकाच्या खून प्रकरणाचा उलगडाही स्थागुशाने मोठ्या शिताफीने केला. इतर अनेक तपासही करण्यात आले आहेत.

Web Title: Murder; Robbery investigation successfully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.