Motorcycle rally organized in Jalna for Jijau Jayanti | जालन्यात जिजाऊ जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले
जालन्यात जिजाऊ जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले

जालना : जिजाऊ जयंतीनिमित्त जालना शहरात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो युवक सहभागी झाले होते. यावेळी जय भवानी जय शिवाजी याच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या रॅलीचा प्रारंभ झाला. जिजाऊ जयंती प्रमाणेच स्वामी विवेकानंद जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. जालना येथील रेल्वेस्थानक परिसरातील पुतळ्यास विविध संस्था आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

या निमित्त विविध संस्था, समाजसेवाकांनी रॅली सहभागी झालेल्या युवकांसाठी चहा-पानची व्यवस्था केली होती. जालन्यापासून अवघ्या २५ किलो मीटर अंतरावर मॉ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथेही हजारो भाविक शनिवारी सकाळपासूनच रवाना झाले होते.


Web Title: Motorcycle rally organized in Jalna for Jijau Jayanti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.