The 'Gutkha' is all but two lakhs | ‘तो’ गुटखा सव्वा दोन लाखांचा
‘तो’ गुटखा सव्वा दोन लाखांचा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील तोतला पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सोमवारी रात्री सदरबाजार पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा रिक्षा ताब्यात घेतला होता. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मंगळवारी पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी पकडलेला गुटखा २ लाख ११ हजार २०० रूपये किमतीचा असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात वाहन चालक व मालकाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सोमवारी रात्री कारवाई करून गुटख्याची अवैध वाहतूक करणाºया एका रिक्षाला (क्र. एम.एच.१५- ए.जी.१३३०) मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते. या गुटख्याचा अन्न सुरक्षा अधिकारी व. ता. रोडे यांनी मंगळवारी सहकाऱ्यांसमवेत पंचनामा केला. त्यावेळी ११ गोण्यांमध्ये ४४ बॉक्स असा एकूण १७६० पेपर बॉक्समध्ये भरलेला २ लाख ११ हजार २०० रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केल्याचे समोर आले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालक व मालकाविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The 'Gutkha' is all but two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.