आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:58 PM2020-03-18T23:58:01+5:302020-03-18T23:58:28+5:30

देऊळगाव ताड येथील प्रियंका गाडेकर हिने आधी दहावीचा पेपर दिला अन् नंतर आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

First the paper ... then the funeral at the mother | आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार

आधी पेपर...नंतर आईवर अंत्यसंस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : आजाराने ग्रस्त असलेल्या आईचे बुधवारी सकाळी निधन झाले. ऐवढा मोठा दु:खाचा डोंगर असतानाही भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथील प्रियंका गाडेकर हिने आधी दहावीचा पेपर दिला अन् नंतर आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
देऊळगाव ताड येथील मंगलबाई गाडेकर (४५) या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचे बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. याच दिवशी केदारखेडा येथील रामेश्वर विद्यालयाच्या केंद्रावर प्रियंकाचा दहावीचा विज्ञान भाग २ विषयाचा पेपर होता.
घरात आईचा मृतदेह आणि सेंटरवर पेपर या विवेचनेत असलेल्या प्रियंकाने अश्रू पुसून परीक्षा केंद्र गाठले. आधी दहावीचा पेपर अन् नंतर आईवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय तिने घेतला. अश्रू पुसून प्रियंकाने पूर्ण पेपर सोडून प्रियंका घरी परतली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रियंकाच्या या धाडसाचे रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. बोर्डे, केंद्र संचालक एन. एस. तळेकर, पर्यवेक्षक ए. एस. सोनूने आदींनी कौतुक करुन प्रोत्साहन दिले.

Web Title: First the paper ... then the funeral at the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.