भोकरदन शहरात फटाक्यांच्या आतषबाजीची हॅटट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:05 AM2019-11-27T01:05:11+5:302019-11-27T01:05:32+5:30

भोकरदन शहरात राज्यातील सरकार स्थापनेबद्दल फटाक्यांची आतषबाजी करण्याची हॅटट्रिक झाली आहे़

Fireworks fireworks hat-trick in Bhokardan city | भोकरदन शहरात फटाक्यांच्या आतषबाजीची हॅटट्रिक

भोकरदन शहरात फटाक्यांच्या आतषबाजीची हॅटट्रिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरात राज्यातील सरकार स्थापनेबद्दल फटाक्यांची आतषबाजी करण्याची हॅटट्रिक झाली आहे़ आठ दिवसापूर्वी राज्यात कॉग्रेस, शिवसेना, व राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता स्थापन होऊन उध्दव ठाकरे हे शपथ घेणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या, त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतषबाजी केली.
मात्र, त्यानंतर पाठिंब्याचे पत्रच मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेचे सरकार स्थापन झाले नव्हते, त्यामुळे भाजपने त्याची खिल्ली उडविली होती.
त्यानंतर तीन दिवसांपूर्वी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौक, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडले होते.
२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान फडणवीस व अजित पवार यांनी राजीनामा दिला व शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने मंगळवारी सायंकाळी फटाके फोडून त्याचे स्वागत केले.
यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जालन्यात स्वागत
शहरात सायंकाळी मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव घोषित झाले. या निर्णयाचे शिवसेनेकडून पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, शहराध्यक्ष दीपक रणनवरे, बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश कठोठीवाले, प्रकाश घोडे, रामेश्वर कुरील, गणेश तरासे, संतोष जमधडे आदी.

Web Title: Fireworks fireworks hat-trick in Bhokardan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.