भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारींचे निरसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:00 AM2020-03-09T00:00:14+5:302020-03-09T00:00:20+5:30

पीडित महिला, मुलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल २४ तास कार्यान्वित राहणार आहे. एकतर्फी निर्णय न देता योग्य न्याय मिळावा, यासाठी हे दल काम करेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

Every complaint in the trust cell will be resolved | भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारींचे निरसन होणार

भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारींचे निरसन होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पीडित महिला, मुलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल २४ तास कार्यान्वित राहणार आहे. तक्रारदारांच्या तक्रारीचा निपटारा होईपर्यंत तक्रार बंद केली जाणार नाही. एकतर्फी निर्णय न देता योग्य न्याय मिळावा, यासाठी हे दल काम करेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलचे उद्घाटन महिला कर्मचारी ज्योती राठोड यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, अनया अग्रवाल, डॉ. सीमा निकाळजे, डॉ. कलिंदा उढाण, शमीमाबी पठाण, डॉ. कदम, विद्या लंके, ओहळ, पोनि यशवंत जाधव, पोनि व्यास, पोनि महाजन, सपोनि पाटील, पोउनि पल्लवी जाधव, पूजा पाटील, तुपे, व्ही. नागरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, भरोसा सेल च्या प्रमुख पोउपनि एस. बी. राठोड, संजय सोनवणे, शेख, गायकवाड, जिजा पवार, एम. शेख, एस. बोराडे, प्रतिभा पंडुरे, के. पांगळे, सुनील गायकवाड, गणेश वाघ, शिंदे, गायकवाड, मंदा पवार, पूनम भट्ट आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय सोनवणे, शमशाद पठाण यांनी तर आभार पोउपनि राठोड यांनी मानले.
या सेवांचा समावेश
पोलीस दलाच्या भरोसा सेल मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यातंर्गत संरक्षण, विधी विषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाईन, महिला हेल्पलाईन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पिडीत महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Every complaint in the trust cell will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.