बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:00 AM2019-08-06T01:00:12+5:302019-08-06T01:00:58+5:30

भोकरदन मार्गावरील वसुंधरानगरमध्ये सायंकाळी अचानक छापा टाकून, बायो पेस्टीसाईड अर्थात पीकवाढ संजीवकाचा बनावट आणि विनापरवाना विक्री करतांना आढळून आला

Bogus pesticide stocks seized | बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त

बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चार महिन्यांपूर्वी बनावट सेंद्रिंय खतसाठा जप्त केल्यानंतर सोमवारी कृषी विभागाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भोकरदन मार्गावरील वसुंधरानगरमध्ये सायंकाळी अचानक छापा टाकून, बायो पेस्टीसाईड अर्थात पीकवाढ संजीवकाचा बनावट आणि विनापरवाना विक्री करतांना आढळून आला आहे. या खताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यावरच हा साठा बनावट आहे की, नाही हे सिध्द होणार आहे. वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये साठवलेले ८० बॉक्स आढळून आल्याने खळबळ उडाली.
कृषी विभागाच्या अधीक्षक कार्यालयात गोपनीय माहिती मिळाल्यानुसार स्वत: कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी अधिकारी देश्पाांडे, कृषी अधिकारी कºहाड यांनी सोमवारी सायंकाळी वसुंधरानगरमध्ये असलेल्सा समृध्दी क्रॉप सायन्सच्या गोदामावर छापा टाकला. प्रारंभी दुकानाचे शटर उघडण्यासही संशयित रमेश कारभारी चिकणे याने नकार दिला. परंतु ज्यावेळी अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगताच चिकणेने सर्व ती माहिती दिली.
या छाप्यात रिअल गेल, सोया स्पेशल, एस. कॉटन आदींच्या द्रवरूप बाटल्यांमध्ये हे कृषी संजीवक भरून त्याची विक्री केली जात होती. हे उत्पादन करण्यासाठी संबंधिताकडे परवाना नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकूणच खतांच्या साठ्या नंतर हे कृषी संजीवक पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Bogus pesticide stocks seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.