बंधाऱ्यात आढळला एकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:33 AM2019-10-07T00:33:30+5:302019-10-07T00:33:43+5:30

जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका व्यक्तीचा कोल्हापुरी बंधा-यात बुडून मृत्यू झाला.

The body of one was found in the dam | बंधाऱ्यात आढळला एकाचा मृतदेह

बंधाऱ्यात आढळला एकाचा मृतदेह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका व्यक्तीचा कोल्हापुरी बंधा-यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे समोर आली.
पुरूषोत्तम अशोक देशमुख (४२ रा. दहिगाव) असे मयताचे नाव आहे. दहिगाव येथील पुरूषोत्तम देशमुख हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यांचा कुठलाच सुगावा लागला नाही. रविवारी पहाटेच्या सुमारास दहिगाव जवळील पूर्णा नदीवर बांधलेल्या कोल्हापुरी बंधा-यात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयतावर रविवारी दुपारी दहिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
अल्पभूधारक शेतकरी असलेला पुरूषोत्तम हे आपल्या परिवारातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Web Title: The body of one was found in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.