बदनापूर मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:58 AM2019-10-25T01:58:59+5:302019-10-25T01:59:24+5:30

अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले.

BJP's lotus blossoms again in Badnapur constituency ... | बदनापूर मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलले....

बदनापूर मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलले....

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा कुचे यांच्या कामी आली असून, भोकरदन तालुक्यातूनही कुचे यांना मोठी लीड मिळाली.
बदनापूर विधानसभा मतदार संघात खरी लढत ही भाजपचे नारायण कुचे व राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यात झाली. निवडणूक प्रचारात झालेले आरोप- प्रत्यारोप, आघाडीने केलेली मोर्चे बांधणी, निवडणूक रिंगणातील इतर उमेदवार पाहता अनेकांनी या निवडणुकीत कुचे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा, प्रत्येक बुथवर लावलेली फिल्डींग ही तगडी होती, हेच या निकालातून दिसून आले.
बदनापूर विधानसभा मतदारसंघात बदनापूर, भोकरदन, अंबडसह अन्य दोन तालुक्यांतील गावे आहेत. मात्र या तीन तालुक्यांतील गावे मोठ्या प्रमाणात आहेत़ यापैकी भोकरदन तालुक्यातील गावांची मतमोजणी प्रथम सुरू झाली होती. त्यामधे आ. नारायण कुचे यांना भोकरदन तालुक्यातील गावांमधून एकूण १० हजारांचे मताधिक्य मिळाले आणि हे मताधिक्य पुढे वाढतच गेले़ मात्र हे बदनापूर व अंबड तालुक्यात भोकरदन तालुक्याएवढे मताधिक्य मिळाले नाही़
बदनापूर शहरात लोकसभेच्या निवडणुकीत ९६५ मतांचे मताधिक्य आघाडीच्या उमेदवाराला मिळाले होते. मात्र यावेळी आ. नारायण कुचे यांना शंभर मतांची आघाडी मिळाली. म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा महायुतीला यावेळी बदनापूर शहरातून एक हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत़ त्यातही शहरातील वार्ड क्र २ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला ४७५ मतांची आघाडी मिळाली.
सलग आठ फेऱ्यांमधे महायुतीचे उमेदवार आ. नारायण कुचे यांना मताधिक्य मिळत असताना ९ व्या फेरीत आघाडीचे बबलू चौधरी यांना अवघ्या दहा मतांचे मताधिक्य मिळाले होते.
नंतरच्या काही फे-यांमधेही मताधिक्य मिळाले. मात्र पुढे त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली नाही.
नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे खा. रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून तब्बल ६३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला त्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले.
यावरही भाजपला चिंतन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: BJP's lotus blossoms again in Badnapur constituency ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.