बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 01:09 AM2020-02-01T01:09:20+5:302020-02-01T01:09:42+5:30

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला.

Bank employees hamper transactions | बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा मोठा परिणाम औद्योगिक आणि व्यापारी शहर असलेल्या जालन्यात जास्त दिसून आला. दररोज काही कोटींची देवाण- घेवाण बँक व्यवहारातून होते. ती आता सलग तीन दिवस ठप्प होणार असल्याने रक्कम सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यापारी, उद्योजकांवर आली आहे.
जालन्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या जवळपास १५ शाखा आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात तालुका आणि गाव पातळीवर मिळून ही संख्या ३४ च्या घरात पोहोचते. विशेष म्हणजे या राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँकांचे व्यवहार सुरू असूनही त्याचा कुठलाच उपयोग झाला नाही. बँकेत रक्कम जमा करण्यापलीकडे सहकारी बँकेत कुठलेच व्यवहार झाले नाहीत.
दररोज विविध उद्योजक, व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे धनादेश हे सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा होतात. परंतु याचे क्लिअरिंग हाऊस अर्थात वटविण्याचे केंद्र हे एसबीआयमध्ये आहे. त्यातच ही बँकही संपात सहभागी होती. त्याचा मोठा परिणाम व्यवहारावर झाला आहे. सकाळी येथील शिवाजी पुतळा परिसरात पूर्वीची एसबीएच आणि आता बँक विलिनीकरणानंतरच्या एसबीआय बँकेसमोर बँक युनियनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी जोरदार निदर्शने केली.
मागणी : क्लिअरिंग हाऊस नियमित सुरूच ठेवण्याची गरज
राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी, कर्मचा-यांच्या मागण्या रास्त आहेत, त्याकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांचा संप होत आहे. असे असले तरी, किमान संप सुरू असताना क्लिअरिंग हाऊस असलेल्या बँकेत किमान दोन अधिका-यांची नियुक्ती करून हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा परिणाम सहकारी बँकांवर होणार नाही. आणि धनादेश वटण्यास अडचणी येत नाहीत, असे सहायक सरव्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.

Web Title: Bank employees hamper transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.