परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:00 AM2019-10-20T01:00:09+5:302019-10-20T01:00:24+5:30

जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.

In the back of the city, the water is the only water in the rain | परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरीच्या साधारणत: ८० टक्क्यांपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला आहे. मात्र मोठे पाऊस न झाल्याने भोकरदन तालुका वगळता इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडेठाक आहेत. शनिवारी सायंकाळी तासभर जालना शहरासह परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यातून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागली.
परतूर शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. परतूर शहरासह अंबा, कावजवळा, आनंदवाडी, रोहिणा, एकरूखा, कोरेगाव, मापेगाव, शिंगोना, सोंयजना, पाडळी, राहीणा (बु.), बामणी, शेलवडा, वरफळ, चिंचोली, रायपूर, सिरसगाव इ. भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला मात्र फटका बसणार आहे.
भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, मका या खरीप पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र; दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील भोकरदन, पारध, वालसावगी, धावडा, केदारखेड, राजूर, आनवा, आव्हाना, सिपोरा बाजार, दानापूर, जळगाव सपकाळ, नळणी या भागांत पाऊस झाला.
या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. राजूर भागात झालेल्या पावसामुळे कपाशीला जीवदान मिळाले आहे. शिवाय रबी पिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भागातील चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे राजूरसह परिसरातील पंधरा गावांचा पाणी प्रश्न बिकट आहे. त्यामुळे पंधरा गावांतील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच दाभाडी व परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी मोठा पाऊस झाला तर रबी हंगामाला दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
वीज पडून बैलाचा मृत्यू
वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल रंगनाथ तांगडे हे शनिवारी दुपारी बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. यात तांगडे यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
अवजड वाहने चिखलात फसली
वालसावंगी : वालसावंगी- पारध रस्त्याच्या कडेला दोन वाहने चिखलात फसली होती. दोन्ही वाहने जवळजवळ फसल्याने या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरच थांबल्याने या मार्गावरून येणा-या- जाणा-या नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Web Title: In the back of the city, the water is the only water in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.