रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:17 AM2019-09-12T01:17:13+5:302019-09-12T01:17:52+5:30

रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Awarded Teacher Award on behalf of Rotaract Club | रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शाळांमधील निवड झालेल्या शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार हा पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.
यात वि.वि. गोरंट्याल प्राथमिक विद्यालयातील के.बी. राठोड, श्री.म.स्था.जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील अरुण कासलीवाल, सी.टी.एम.के गुजराथी स्कूलमधील कृष्णा सपकाळ, महाराष्ट्र हायस्कूल मधील भाग्यलक्ष्मी गुंटूक, राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील संदीप गाढेकर, डॉ.फेजर बॉईज हायस्कूलमधील आशिष घोरपडे, जि.प. शाळा सिद्धार्थ नगर येथील दीपा चितकलवर जि.प. शाळा पिंपळ शेरमुलकी येथील अमोल येनकर, जि.प. शाळा चांदई ठोम्बरी येथील दीपक गाढेकर, जि.प. प्रा. शाळा चांदई टेपली येथील सचिन आकार, जि.प. शाळा चांधई एक्को येथील अनिल वरकड, शिवाजी हायस्कूल येथील व्ही.ए. घुगे तसेच आर.एच.व्ही. प्रायमरी स्कूल येथील पी.जे सोमाणी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रो. पीयूष गादिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकल्प प्रमुख स्नेहल लुणावत, करिष्मा जैन, पुनित पंजाबी, प्रतीक्षा लड्डा यांच्यासह लिटरसी हेड ऐश्वर्या नागोरी, रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलचे इतर सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Awarded Teacher Award on behalf of Rotaract Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.