औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:06 AM2019-08-19T01:06:13+5:302019-08-19T01:06:39+5:30

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे.

Aurangabad, Jalna Voting for local self-government constituency today | औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून आश्यक ती तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या सभागृहात हे मतदान सकाळी ८ ते ४ या वेळेत होणार
आहे.
या निवडणुकीसाठी प्रत्येक तहसीलदार हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांना तैनात करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात एकूण २७२ मतदार आहेत. त्यात जालना जिल्हा परिषद ६४, भोकरदन- २०, जाफराबाद- १९, जालना न.प. ६७, बदनापूर १९, मंठा- १९, घनसावंगी - १९, परतूर- २३ आणि अंबड २२ असा समावेश आहे.
जालना शहरातील मतदान हे तहसील कार्यालयात होणार असून, सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
यावेळी कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल मतदारांना मतदान केंद्रात नेता येणार नाही. बॅलेट पेपरवर हे मतदान होणार आहे.
शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हलविले आहे. हे सहलीवर गेलेले नगरसेवक सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत थेट मतदान केंद्रावर पोहोचतील, असे नियोजन केले आहे. भाजपाचे नगरसेवक यावेळी स्थानिक शहरातच दिसून आले. या निवडणुकीत युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी हे रिंगणात आहेत.

Web Title: Aurangabad, Jalna Voting for local self-government constituency today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.