And in Pokhari-Sindhkhed, Ganga disappears due to Ganga ... | अन् पोखरी-सिंंदखेडमध्ये गंगा अवतरल्याने ग्रामस्थ हरखले...
अन् पोखरी-सिंंदखेडमध्ये गंगा अवतरल्याने ग्रामस्थ हरखले...

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सोमवारी दिली.
सोमवारी जालना तालुक्यातील पोखरी-सिंदखेड येथे दानशूर संदीप गायकवाड यांच्या पुढाकारातून हातपंप घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवून दिल्याने या भागातील पाणीप्रश्न ऐन दुष्काळा सुटला आहे. या उपक्रमाचे जलपूजन सोमवारी संदीप गायकवाड यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, संजय देठे, ब्रह्मा वाघ, हरिहर शिंदे यांचू प्रमुख उपस्थिती होती.
यंदाचा दुष्काळ तीव्र स्वरूपाचा आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण फेब्रवारीपासूनच जालना तालुक्यातील जवळपास ३० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला होता. तेथील समस्य आणि अडचणी जाणून घेऊन त्या गावांना जालन्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजकांकडून मदत देण्यासाठी चा एक कृती कार्यक्रम तयार केला. त्यानुसार त्यांच्याकडे जावून आणि ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता त्यांच्या लक्षात आणून देऊन समाजाचे आपणही काही देणे लागतो यातून या सर्वांची मोठी साथ मिळाली. त्यातच डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमए ने देखील याकामी मोठी मदत केली.
दुष्कळावर फुंकर घालण्यासाठी शासनाच्या उपाय योजना पाहिजे तेवढ्या समाधानकारक नाहीत, त्यामुळे समासजातील अर्थसंपन्न व्यक्तींची मदत घेऊनच त्यावर मात करणे शक्य होणार असल्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी यावेळी सांगितले. संदीप गायकवाड यांनी देखील आपल्याला ही संधी मिळाल्या बद्दल शिवसेनेचे आभार मानले. यावेळी संतोष खरात, विठ्ठल खरात, कडूबा इंदलकर, दत्ता खलसे, मधुकर खरात, राधाकिसन खरात, सोपान कावळे, प्रकाश खरात, शिवाजी जाधव, नंदू पारळकर, शिवाजी घडलिंग, मिरजा जिने, किसन घडलिंग, पंडित खरात आदींची उपस्थिती होती.

 


Web Title: And in Pokhari-Sindhkhed, Ganga disappears due to Ganga ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.