दोन वर्षांपासून रखडलेल्या कठड्याचे साहित्य पडून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:00 AM2019-11-22T01:00:20+5:302019-11-22T01:00:31+5:30

मागील दोन वर्षांपासून परतूर- सातोना रस्त्यावरील चिंचोली नाल्यावरील कठड्याचे काम रखडलेले आहे. येथे आणून टाकण्यात आलेले साहित्यही धूळ खात पडून आहे.

After two years of hard rock material fallen on road | दोन वर्षांपासून रखडलेल्या कठड्याचे साहित्य पडून...

दोन वर्षांपासून रखडलेल्या कठड्याचे साहित्य पडून...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : मागील दोन वर्षांपासून परतूर- सातोना रस्त्यावरील चिंचोली नाल्यावरील कठड्याचे काम रखडलेले आहे. येथे आणून टाकण्यात आलेले साहित्यही धूळ खात पडून आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परतूर- सातोना रस्त्यावरील चिंचोली नाल्यावरील जुना पूल निम्न दुधनाच्या बॅक वॉटरमध्ये काही वर्षांपूर्वी गेला आहे. यामुळे नवीन पूल तयार करून त्याची उंची वाढविण्यात आली आहे.
या पुलाखाली पंचवीस ते तीस फूट पाणी असते. पाणी ओसरले तर पुलाची उंची ५०- ६० फूट असते. यामुळे एखादे वाहन खाली गेल्यास मोठी हानी होऊ शकते. आजवर अनेक वाहने पुलावरून खाली पडून अपघात देखील झालेले आहेत. विशेष म्हणजे या पुलावरच वळण रस्ता असल्याने अधिकच भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने येथे कठडे बसविण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी संबंधित ठेकेदाराने कठड्याचे साहित्यही या ठिकाणी आणून टाकले आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. मागील वर्षी पाणी खाली सोडल्याने बॅक वॉटर खाली गेले आहे.
या पुलावर ज्या ठिकाणी कठडे बसवायचे होते, त्याच जागेतून एका गावासाठी पाईप लाईन जात आहे. पाईपलाईनचे व कठडे बसविण्याचे काहीच नियोजन न केल्याने हे कठडे कोठे व केव्हा बसविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिंचोली ते चिंचोला नाला पूल या दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रस्ता फोडून पाईपलाईन केली आहे. यामुळे पाईपलाईच्या जागेवर खड्डे पडले आहेत. याकडे सार्वजनिक विभागाने दुर्र्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: After two years of hard rock material fallen on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.