प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:29 AM2019-10-21T00:29:55+5:302019-10-21T00:30:00+5:30

सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Admin is ready | प्रशासन झाले सज्ज

प्रशासन झाले सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी सकाळपासूनच मतदानासाठी आवश्यक असलेले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि अन्य साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. बस तसेच खाजगी वाहनातून सायंकाळी अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. रविवारी पाऊस असल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
जालना विधानसभा मतदार संघासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून साहित्य नेण्याची व्यवस्था केली होती. सकाळी १० वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी आयटीआयमध्ये दाखल झाले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर कुठले साहित्य आणि कुठल्या क्रमांकाचे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट द्यायचे, याची निश्चिती करण्यात आल्यावर ते तपासून संबंधित मतदान केंद्र अधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. जालना विधानसभा मतदार संघात एकूण ३१८ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी जवळपास १५०० पेक्षा अधिक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून, ३५० पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात आहे.

Web Title: Admin is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.