कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:39 AM2019-08-26T00:39:40+5:302019-08-26T00:40:30+5:30

ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.

Activists announce 'EVM removal, rescue of country' | कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा

कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.
यानिमित्ताने राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. ईव्हीएम विरोधातील लढा यापुढील काळात तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस रवि भिलाने, युसूफ परमार, सत्वशील मेश्राम, फिरोन मिठीबोरवाल, यश परांजपे, ज्योती बडेकर, सोहेल वरालिया यांची प्रमुख उपस्थिती होती. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी राज्यात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस नंदकिशोर जांगडे, अनिल मिसाळ, राजेंद्र जाधव, सुशिल वाघमारे, गजानन गित्ते, स्वप्नील सावंत, मिलींद बोर्डे, अनिल ढवळे, नरेश वाढेकर, संजोग हिवाळे, अ‍ॅड.योगेश गुल्लापेल्ली, बळीराम कोलते, जगन्नाथ ठाकुर, नितीन बावणे, मुकूल निकाळजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Activists announce 'EVM removal, rescue of country'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.