Xiaomi ब्लॅकलिस्ट! जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 01:38 PM2021-01-15T13:38:06+5:302021-01-15T13:38:56+5:30

Xiaomi Blacklist in america: चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे.

Xiaomi Blacklisted in America; Donald Trump's big blow to China | Xiaomi ब्लॅकलिस्ट! जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला मोठा दणका

Xiaomi ब्लॅकलिस्ट! जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला मोठा दणका

Next

अमेरिकेमध्ये वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाताजाता चीनला जोरदार धक्के दिले आहेत. चिनी सरकारी ऑईल कंपनी चाइना नेशनल ऑफशोर ऑयल कॉर्प (CNOOC) वर कारवाई करताना स्मार्टफोन कंपनी शाओमी Xiaomi Corp ला देखील ब्लॅकलिस्ट केले आहे. 


चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. दक्षिण चीन समुद्रात उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनवर दबाव वाढविण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. 


खोल समुद्रात तेलाचा शोध घेणारी चीनची मोठी सरकारी कंपनी चायना नॅशनल ऑफशोर ऑईल कॉर्पवर बंधने लादताना म्हटले आहे की, कोणत्याही परवानगीशिवाय ही कंपनी अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरू शकत नाही. याआधी डिसेंबर 2020 मध्ये अमेरिकी सरकारने 60 चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले होते. 
 

Web Title: Xiaomi Blacklisted in America; Donald Trump's big blow to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.