पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या; सुखी देशांच्या यादीत भारताला सख्ख्या शेजाऱ्यांनी पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:09 AM2021-03-20T09:09:42+5:302021-03-20T09:11:21+5:30

World Happiness Report 2021: संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 

World Happiness Report declared, India is on 139, Finland on first, Pakistan on 105 | पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या; सुखी देशांच्या यादीत भारताला सख्ख्या शेजाऱ्यांनी पछाडले

पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या; सुखी देशांच्या यादीत भारताला सख्ख्या शेजाऱ्यांनी पछाडले

Next

गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीने जगभरात हाहाकार उडविला आहे. आतापर्यंत 27 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. (Finland is first Happiest county in the world by fourth time.)


फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 


या रिपोर्टमध्ये असे आढळले आहे की, कोरोना महामारीतून धडा घेताना पैसा नाही तर आरोग्यावर जोर द्यावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने हा रिपोर्ट तयार केला आहे. यामध्य़े डेन्मार्क दुसऱ्या आणि स्वित्झरलँड तिसऱ्या नंबरवर आहे. 


जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिका गेल्या वर्षी या यादीत 18 व्या नंबरवर होता. यंदाच्या यादीत तो 14 व्या नंबरवर आला आहे. तर ब्रिटन पाच अंकांनी घसरून 18 व्या स्थानावर आला आहे. 149 देशांच्या या आनंदाचा स्तर शोधण्यासाठी गॅलपच्या आकड्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये जीवनाची गुणवत्ता, सकारात्मकपणा आणि नकारात्मकतेच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 


चीन विसाव्या नंबरवर
भारतानंतर बुरूंडी, येमन, टांझानिया, हैती, मालावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तान या देशांचा नंबर लागतो. मात्र, सख्खे शेजारी असलेले नेपाळ 87, पाकिस्तान105, चीन 20, बांग्लादेश 101, श्रीलंका 129 आदींनी भारताला मागे टाकले आहे. चीन गेल्यावर्षी 94 व्या स्थानी होता.

 काय होते प्रश्न...
सकारात्मक भावाच्या श्रेणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही काल हसला होता का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर नकारात्मक भावाच्या व्यक्तींना तुम्ही ज्या दिवशी हसला होता त्या दिवशीच कोणत्याही गोष्टीवरून नाराज झाला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशाप्रकारे लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेच्या आधारावर लोकांमधील संतोष भाव जाणण्यात आला आहे. 
 

Web Title: World Happiness Report declared, India is on 139, Finland on first, Pakistan on 105

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.